भारतीय नौदलात मेडिकल असिस्टंट पदावर निवड; पूर्वेश माळी यांचा महाकाल गृपकडून सत्कार - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

19/07/2026

भारतीय नौदलात मेडिकल असिस्टंट पदावर निवड; पूर्वेश माळी यांचा महाकाल गृपकडून सत्कार

 

लासुर - चोपडा (प्रतिनिधी) : - -

         भारतीय नौदलात मेडिकल असिस्टंट पदावर निवड; पूर्वेश माळी यांचा महाकाल गृपकडून सत्कार

         चोपडा तालुक्यातील लासूर येथील श्री. गुणवंत सिताराम माळी यांचे सुपुत्र चि. पूर्वेश गुणवंत माळी यांची भारतीय नौदलात (Indian Navy) मेडिकल असिस्टंट पदावर निवड झाल्याबद्दल महाकाल गृप, लासूर यांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

         पूर्वेश माळी यांनी अथक परिश्रम, जिद्द व चिकाटीच्या जोरावर भारतीय नौदलासारख्या प्रतिष्ठित सेवेत स्थान मिळविले आहे. त्यांच्या या यशामुळे लासूर गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

           यावेळी महाकाल गृपच्या पदाधिकाऱ्यांनी व उपस्थित मान्यवरांनी पूर्वेश माळी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. युवकांनी स्पर्धा परीक्षा व संरक्षण दलातील करिअरकडे वळावे, यासाठी पूर्वेश यांचे यश प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. पूर्वेश माळी यांच्या या यशाबद्दल त्यांचे पालक, कुटुंबीय तसेच ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असून त्यांच्या भावी सेवाकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

         त्याप्रसंगी क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र गुजरात मध्यप्रदेश चे अध्यक्ष ए. के. गंभीर, नाटेश्वर पीक संरक्षण सोसायटी चे माजी व्हा. चेअरमन किशोर माळी, श्री संत सावता माळी युवक संघाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन, महाकाल गृप चे अध्यक्ष पवन महाजन, उपाध्यक्ष साहेबराव मगरे, सचिव अमोल गंभीर, खजिनदार निलेश राजकुळे, सदस्य भुमेश्वर मगरे, प्रेमराज शेलकर, आर डी महाजन, नितीन माळी, महेंद्र माळी, समाधान महाजन, विनोद मगरे, महेश माळी, योगेश माळी, मनोज महाजन आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp