रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

21/07/2026

रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न...

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न... 

          गरजू विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षांचे पुस्तक संच वाटप , इंटरॅक्ट क्लबची स्थापना

         चोपडा शहरातील धनवाडी रोडवरील लक्ष्मी नारायण लॉन्स येथे रविवारी सायंकाळी संपन्न झालेल्या या भव्य व दिमाखदार सोहळ्यात रोटरी क्लब ऑफ चोपडाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात संपन्न झाला. यावेळी चोपडा रोटरी क्लबचे 56 वे अध्यक्ष म्हणून संजय बारी यांना मावळते अध्यक्ष आशिष जयस्वाल यांनी अध्यक्षपदाची कॉलर, चार्टर प्रदान केले. तर लीना पाटील यांना विश्वास दलाल यांनी मानद सचिव पदाची सूत्रे सुपूर्द केली. गौरव महाले व चंद्रशेखर साखरे यांना निखिल सोनवणे व संदीप सूर्यवंशी यांनी अनुक्रमे कोषाध्यक्ष व सहसचिव पदाची जबाबदारी मान्यवरांच्या उपस्थितीत सुपूर्द केली.

           यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी, रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे सहप्रांतपाल रोटे. हरविंदरसिंग थेथी यांच्यासह उपप्रांतपाल ॲड. रुपेश पाटील, अतिरिक्त जिल्हा सचिव नितीन अहिरराव, जिल्हा सहसचिव आशिष जयस्वाल, अमळनेर एन्कलेव चेअर विलास एस. पाटील हे उपस्थित होते.
            रोटरी ही संस्था आपल्या चार तत्वांना प्रमाण मानून कार्य करते. त्याचवेळी ही तत्वे प्रत्येक रोटेरियनला आत्मपरीक्षणाची संधी देत असतात. रोटरी सदस्याने सदैव हसतमुख राहून आपले सेवाकार्य केल्यास त्याचा सकारात्मक परिमाण कामावर होतो, असे सांगत रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे माजी प्रांतपाल रोटे. राजीव शर्मा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगत रोटरी क्लब ऑफ चोपडाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

         यावेळी बोलतांना महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा . अरुणभाई गुजराथी म्हणाले, गरीब - श्रीमंत, उच्च पदस्थ -निम्न पदस्थ, स्त्री - पुरुष, जात , पंथ, लिंग, वर्ण असा कुठलाही भेद न मानता प्रत्येक जण समान धाग्याने जोडला जावून तो मैत्री आणि सेवेचा विचार समाजात पोहचवतो, ही रोटरीची 'ब्युटी' असल्याचे सांगत चोपडा क्लबच्या कामाचे कौतुक केले. याप्रसंगी उपप्रांतपाल हरविंदरसिंग थेथी यांनी मनोगत व्यक्त केले. नूतन अध्यक्ष संजय बारी यांनी मनोगतातून क्लबच्या भविष्यकालीन वाटचालीविषयी भूमिका मांडली.

           या पदग्रहण सोहळ्याचे सूत्रसंचालन सौ. योगिता पाटील व विलास पी. पाटील यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय डॉ. नीता जयस्वाल, चेतन टाटिया व प्रणय टाटिया यांनी करून दिला. प्रास्ताविक मावळते अध्यक्ष आशिष जयस्वाल यांनी गत वर्षातील प्रकल्पांचा आढावा सादर केला तर आभार प्रदर्शन विद्यमान मानद सचिव लीना पाटील यांनी केले. यावेळी वसंत नागपुरे, क्षितिज पाटील, दिव्येश पटेल, विजय पाटील, विपिन बोरोले, नवीन टाटिया, संदेश शिरसागर या नूतन सदस्यांचे मान्यवरांच्या हस्ते रोटरी पीन लावून क्लबमध्ये स्वागत करण्यात आले. तर महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात स्थापन झालेल्या इंटरॅक्ट क्लबच्या पदाधिकारी विद्यार्थिनींना पिन लावून पदे सोपविण्यात आली. तसेच गरजू विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मार्गदर्शक पुस्तकांचे संच मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आले.

        चोपडा रोटरी क्लबच्या 56 व्या पदग्रहण सोहळ्यास शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, रोटरी सदस्य आणि त्यांचे परिवारजन तसेच अमळनेर, धरणगाव येथील रोटरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp